Sunday, 2 July 2017

वडार समाज पान १३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........

साडेतीन शक्तीपीठे

कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदास्थिता।

मातु:पुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् ।।

तुळजापुरं तृतीय स्यात सप्तशृंग तथैव च।।

महाराष्ट्रात देवीची (आदिशक्तीची) साडेतीन शक्तीपीठे सुप्रसिध्द आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी, माहुरची रेणूका, तुळजापुरची तुळजाभवाणी ही पुर्णपीठे असून वणीचे सप्तश्रृंगी हे अर्धपीठ मानले जाते. क्वचीतच एखादा वडार बांधव असेल की जो या देवींचे पुजन करत नसेल. अख्खा महाराष्ट्र य आदिशक्तींपुढे नत मस्तक होतो. परंतु आपणास हे कदाचित महित नसेल वडार समाजातील पुर्वज जेथे राज्य करीत होते त्या क्षेत्रालाही पुर्ण पीठाचा दर्जाहोता. कालिका पुराणानुसार तर “औंड्रपीठ” हे प्रथम पीठ मानले जाते. शैव परंपरतील महत्वाची जमात म्हणून वडर (औड्र) समाजास सदरचा सन्मान मिळालेला असेल यात शंका नाही.

महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन शक्तीपीठे जरी असली तरी देवीची काश्मीर, कांची व कामाख्या अशी तीन प्रमुख पीठे आहेत. परंतु या तीन पीठांबरोबर एकूण 52 शक्तिपीठांना शास्त्रात मान्यता आहे. प्रत्येक शक्तिपीठाच्या ठिकाणी एक भैरव आणि एक शक्ती असते अशी श्रद्धा आहे. प्रत्येक ठिकाणच्या भैरवाचे आणि शक्तीचे नाव वेगळे असते. बहुतेक पुराणांत शक्तिपीठांची संख्या एकावन्न मानलेली असली, तरी काही ग्रंथातून ही संख्या वेगवेगळी –चार, सात, आठ, अठरा, बावन्न इ. दाखविण्यात आलेली आहे. देवी भागवतात एकशे आठ पीठांचा निर्देश असून तेथे फक्त पीठस्थाने आणि त्याच्या अधिदेवता एवढेच तपशील दिले आहेत. ह्या शक्तिपीठांचा उदगम दोन पुराणकथांशी निगडित आहे.

No comments:

Post a Comment

वडार समाज पान ६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ........... सेटलमेंटस (Sattelments) सेटलमेंटस (Sattelme...