Sunday, 2 July 2017

वडार समाज पान १०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........

वडारी

वडारी आणि बेलदार या प्रामुख्याने मातीकाम करणार्‍या जमाती आहेत. मातीचे डोंगर करणे, मातीचे ढीग उपसणे, शेतांना बांध घालणे, शेतांतली माती सपाट करणे ही कामे वडारी करतात, तर तण माजलेली शेते लागवडीस आणणे ही कामे बेलदार करतात. शिवाय बेलदारांकडे गाढवे असल्याने ते माती आणि विटांची ने-आण करतात. विहिरी खणणे, सुरुंग लावून दगड फोडणे किंवा दगडाच्या खाणी पाडणे ही काम वडार्‍यांची असतात.

वडारांच्या बायका पुर्वी चोळी घालीत नसत. त्या घरबसल्या दगडी जाते, उखळ, पाटा, वरवंटा तयार करणे, पाट्याला टाके मारून देणे वगैरे कामे करतात. त्यांची मातृभाषा तेलुगू कानडी मिश्रित एक बोलीभाषा आहे. शिवाय त्या वडारी पुरुषांबरोबर बांधकामावर मजुरी करून उदरनिर्वाह करतात. प्रत्येक शहरामध्ये एक वडारवाडी असते, तेथे या लोकांची वस्ती असते.

No comments:

Post a Comment

वडार समाज पान ६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ........... सेटलमेंटस (Sattelments) सेटलमेंटस (Sattelme...