Thursday, 6 July 2017

वडार समाज पान ६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........

सेटलमेंटस (Sattelments)

सेटलमेंटस (Sattelments) म्हणजे ब्रिटिश सरकारने गुन्हेगार जमातीच्या कायद्यानुसार भटक्या जमातींसाठी तीन तारांचे कुंपण घालून उभा केलेल्या वसाहती होय. या वसाहती द्वारे भटक्या जमातींना त्यामध्ये बंधीस्त केले जात असे. प्रथम गुन्हाच्या शिक्षेबद्दल या वसाहतीं मध्ये पाठवले जात होत, पण नंतरच्या काळात इतर समाजाच्या दृष्टीकोनात भटक्या विमुक्तांबद्दल हिणतेची भावना जागृत झाल्याने कोणात्याही कारणास्तव वसाहती मध्ये वडार जमातीला पाठवले जावू लागले. गुन्हेगार जमाती कायद्यातील अनेक तरतुदी या अत्यंत जुलमी, कठोर, वेठबिगार, पिळवणूक आणि लाचखोरीला वाव देणा-या असल्याने या वसाहती माणसे डांबण्याचे कोंडवाडेच बणून गेले होत.

वडार समाज पान ५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........

परिणाम

संस्थानिकांच्या नंतरच्या नागरीकरणाच्या काळात ब्रिटिश शासनाच्या माध्यमातून वडार समाज स्थीर झाल्याचे आढळून येते. तरीही गुन्हेगार जमाती कायद्याचा वडार जमातीवरचा परिणाम प्रतिगामी स्वरूपाचा होता. या कायद्याद्वारे वडार जमातीतील लोकांची नोंदणी पोलिस अधिका-यांकडे करणे बंधनकारक झाले. तसेच ठराविक कालावधीनंतर प्रत्येक वडाराने पोलिस अधिका-याकडे सांगेल तेव्हा हजेरी देणे आवश्यक होते. कोठेही स्थलांतर होतांना पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक बनले. नंतरच्या काळात नोंदणी केलेल्या जमातीतील सदस्यांना हद्दपार केले जावू लागले. जिल्हाबंदी व गावबंदी होवू लागली. परिस्थीती नुसार सेटलमेंटसमध्ये वडार समाजाला बंधीस्त करण्यात आले.

वडार समाज पान ४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........

कारणे

वडार समाजाचा गुन्हेगारी जमातीच्या कायद्यामध्ये समावेश का केला असेल याची कारणे शोधतांना नक्की अशी कारणे समोर येत नाहीत. ज्या प्रमाणे काही जमाती टोळ्यांच्या स्वरूपात काम करतात त्याप्रमाणे वडार समाजात टोळींच्या स्वरूपात कामकरण्याची प्रवृत्ती वडार समाजात दिसून येत नाही. बांधकाम क्षेत्राशी जवळीकता पाहता सुरूंग वापरण्याची कला व क्रांतिकारकांनी रेल्वेतील खजीना लूटीच्या वेळी वडार जमातीचा वापर केल्याची उदाहरणे आढळून येतात. पुर्वी रेल्वे कमी वेगातच धावत असत. रेल्वे लुटीसाठी क्रांतिकारी वडार लोंकांच्या मदतीने रेल्वे रूळावर मोठीमोठी दगडे रचून ठेवत. रेल्वे चालकाला ही गोष्ट लक्षात येताच रेल्वे उलट दिशेने (रिव्हर्स) सुरू होण्याची व्यवस्था होती खरी, परंतु उलट्या बाजुलाही वडार लोक मोठमोठी दगडे क्षणार्धात रूळावर रचत असत अशाप्रकारे रेल्वे जागेवरच बंधीस्त होत होती. या परीस्थितीचा फायदा घेवून रेल्वे लुटल्या जात होत्या, परंतू वडार समाजाच्या उपद्रवाची उदाहरणे येवढ्या प्रमाणात आढळून येत नाहीत की ज्यामुळे त्यांचा या कायद्यात समावेश करता येईल. ब्रिटिशांनी वडार जमातीचा मजुर म्हणूज वापर करण्याच्या हेतूने व वडार जमातीला आपल्या अधिकारात आणन्यासाठी गुन्हेगार जमाती कायद्यात त्यांचा समावेश केल्याची शक्यता दिसून येते. वडार जमातीच्या जीवनावर या कायद्याचा कसा परिणाम झाला हा अभ्यासाचा विषय आहे.

वडार समाज पान ३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........

गुन्हेगार जमात कायदा

सशस्त्र जमातींच्या टोळ्यांचा होणारा उपद्रव लक्ष्यात येताच, ब्रिटिश सरकार या जमातींच्या बाबतीत कायम स्वरूपी उपाययोजनेचा विचार करू लागले. या उपायांचाच एक भाग म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतातील शस्त्रात्र बंदीचा कायदा, 1871 चा गुन्हेगार जमातीचा कायदा हे कायदे पास केले. नंतरच्या काळात 1908, 1911, 1924 असे गुन्हेगार जमाती कायदे करण्यात आले. वडार जमातीस 1912 साली मध्यप्रांतात तर 1929 साली संपुर्ण राज्यात गुन्हेगार जमात म्हणुन जाहिर करण्यात आले. गृहखात्याने दि. 23 जुन, 1931 ला सोलापुर, बेळगांव, विजापुर, धारवाड, दख्खन व दक्षिण मराठा राज्यातील सर्व संस्थाने, म्हैसूर राज्य व मद्रास केंद्रशासित प्रदेश यामध्ये वडार जमातीला गुन्हेगार म्हणुन घोषीत करण्यात आले. मुन्शी कमिशनने गुन्हेगार जमातींच्या कायद्याचा आढावा घेवून 1937 मध्ये 28 जमाती व काही मिश्र गुन्हेगार टोळ्यापैकी फक्त सात (वडार जमातीसह) जमातींना भटक्या जमाती म्हणुन घोषीत केले.

वडार समाज पान २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........

पार्श्वभूमी

सत्तांतराच्या काळात विवीध शासकांनी वर्ण व्यवस्थेला विरोध केला नाही. मुस्लीम शासकांनि वर्णव्यवस्थेच्या सुधारणेसाठी लक्ष्य न देता धर्मांतराच्या माध्यमातुन आपली संस्कृती रुजवणेचा प्रयत्न केला. तसेच नंतरच्या काळात ब्रिटिश राज्यकर्ते व ब्रिटिश अधिकारी यांनी भारतीय जातीव्यवस्था, हिंदुधर्म यांचा अभ्यास केला जरूर परंतु त्यामागील त्यांचा प्रमुख उद्देश प्रशासकीय गरज हाच होता. भारतीय समाजजीवनाच्या अनाकलनामुळे अत्यंत चुकीची गृहीतके सुरूवातीच्या काळामध्ये ब्रिटिश अधिका-यांनी मनामध्ये बाळगल्यामुळे भटक्या विमुक्तांना याची फळे भोगावी लागली. ब्रिटिशांनी भटक्या विमुक्तांच्या सामाजिक परिस्थितीच्या अभ्यासावरून अनेक चुकीचे निष्कर्ष काढले. त्याचा परिणामी गुन्हेगार जमातीच्या कायद्याची रचना करण्यात आली. ब्रिटिश राज्यकर्ते व अधिकारी यांच्या मते भारतात जात आणि व्यवसाय या दोन्ही एकच गोष्टी आहेत. सुताराचा मुलगा सुतार व सोनाराचा मुलगा सोनार असतो आणि शतकानुशतकांपासून त्यांचा तोच व्यवसाय राहतो. धंदेवाईक गुन्हेगारांचा संदर्भात ही सज्ञा विचारात घेतली तर एक गोष्ट स्पष्ट होते की ज्या जमातीचे सदस्य पुरातन काळापासून गुन्हेगार आहेत, ते आपल्या जातीचा उपयोग गुन्हे करण्यासाठीच करतात. युरोपियन राज्यकर्त्यांनी जिप्सींसारख्या जमातींबद्दल कायदे करतांना असे म्हटले होते कि, “बदक हे बदकच असल्याने ते पाण्यातच जाणार. गुन्हेगार जमातीत जन्मलेली व्यक्ती ही गुन्हेगारच होणार

संस्थानिक व ब्रिटिश कालखंड

संस्थानिक व ब्रिटिश यांच्या सत्ता संघर्षा मध्ये भटक्या विमुक्तांनी स्वाभाविकपणे संस्थानिकांच्या बाजुने आपली ताकत लावली. संस्थानिक पुर्वापार विवीध जमातींचा वापर दहशत माजविण्यासाठी करत असत. संस्थानिकांच्यावरील ब्रिटिशांच्या वर्चस्वानंतर उमाजी नाईकांचे बंड, 1857 च्या उठावांच्या मध्ये भटक्या

वडार समाज पान १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........

प्रस्तावना

जात हि अपरिवर्तनीय असून प्रत्येक माणूस जातीने व कर्माने बध्द असतो. ¹ भारतीय चार्तुःवर्ण रचनेत प्रत्येक जातील विशीष्ठ असा व्यवसाय नेमुण दिलेला आहे. इतर व्यवसाय करण्यासारखी अनुकूल परिस्थिती जरी असली तरी प्रचलित चार्तुःवर्ण रचने कडून व जाती मधून सुध्दा संमती मिळणे अवघड गोष्ट होती. वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीत चार स्तर निश्चित स्वरूपात होते. ब्राम्हण या उतरंडीत सर्वात वरच्या स्थानावर होते. त्यांना मिळणारा मान, सवलती व अधिकाड़ याच्या अनुषंगाने हे स्थान अबाधीत राहिल याची पुरेपुर काळजी त्यांनी घेतलेली दिसून येत. वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीच्या पुर्नरचनेची शक्यताच नसल्याने त्याच्यात बदल होणे शक्य नव्हते. यातील काही वर्णांना कर्माच्या आधारावर सर्वात कनिष्ठ स्तरावर स्थानांतर करण्यात आले. परंतु कनिष्ठ स्तरातील शुद्रांना यातुन सुटका होणे शक्य नव्हते त्यातच वर्ण व्यवस्थेची सांगड व्यवसायाशी घातल्यामुळे विशिष्ठ जातीच्या लोकांनी विशिष्ठी व्यवसाय करणे कायम स्वरूपाचे झाले. त्यातच एका जातीने दुस-या जातीचे काम उचलणे म्हणजे कमीपणाचे आहे. असे मानुन जाती व्यवस्थेला बळकटी देण्यात आली.

Sunday, 2 July 2017

वडार समाज पान १२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........

शक्तिपीठांच्या कथा

पहिल्या कथेत दक्ष प्रजापतीची मुलगी सती (पार्वती) ही शंकराला दिलेली होती. दक्ष प्रजापती आणि शंकर या दोघांत वितुष्ट होते. पुढे दक्ष प्रजापतीने ‘बृहस्पतिसव’ नावाचा यज्ञ करावयाचा ठरविले. ह्या यज्ञाचे आमंत्रण शंकराला मात्र दिले नाही. तथापि सती मात्र पतीचा विरोध असताही हट्टाने त्या यज्ञप्रसंगी उपस्थित राहिली. त्या वेळी प्रत्यक्ष पित्याकडून झालेला अपमान असह्य होऊन सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वत:स जाळून घेतले. शंकराला हे समजल्यानंतर त्याने आपल्या जटेतून वीरभद्राला उत्पन्न केले व त्याच्याकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून दक्षालाही ठार मारले आणि दु:खावेगाने यज्ञस्थळी जाऊन शंकराने सतीचे निष्प्राण शरीर मस्तकावर घेऊन तांडव नृत्य सुरू केले. तांडव नृत्य म्हणजे शंकराचे विनाशकारी स्वरूप होय. भगवान शंकराला शांत करण्याच्या हेतूने विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या पार्थिवाचे अवयव तोडण्यास प्रारंभ केला. सतीच्या मृत देहाची अंग-प्रत्यंगे जेथे जथे पडली, तेथे तेथे शक्तिपीठे निर्माण झाली.

शक्तिपीठांच्या निर्मितीसंदर्भात जी दुसरी पुराणकथा आहे ती अशी : विष्णुभक्त अंबरीष राजाच्या एकादशीच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास मुनी आपल्या साठ हजार शिष्यांसह सकाळीच ह्या राजाकडे आले. त्या दिवशी राजाच्या व्रताचे उद्यापन होते. दुर्वास ऋषी वेळेवर न परतल्याने त्यांच्यासारख्या थोर अतिथीला सोडून व्रताचे उद्यापन करायचे, की अतिथी आल्यावर जेवून व्रत मोडायचे हा प्रश्न राजाला पडला. शेवटी राजाने तुळशीचे तीर्थ घेऊन उपवास सोडला आणि भोजनासाठी आलेल्या इतर लोकांना जेवू घातले. झाल्या प्रकाराने दुर्वास संतापले आणि त्यांनी राजाला शाप दिला, की ह्या व्रताचे फळ तुला मिळणार नाही आणि तुला शंभर जन्म घ्यावे लागतील. मग विष्णूने अंबरीषाला त्या शापापासून अभय दिले आणि विष्णूसह सर्व देवांनी दुर्वासांच्या शापवाणीने अंबरीषाला मिळणारे शंभर जन्म आपसात वाटून घेतले. त्यांपैकी एकावन्न जन्म देवीने स्वीकारले. त्यामुळे एकावन्न शक्तिपीठे निर्माण झाली.

==औंड्रपीठ== अशा या पीठांच्या उल्लेखात “औंड्रपीठ” चाही ऊल्लेख विवीध ग्रंथात, पुराणात आढळूण येतो. विष्णू पुराणात कमला स्त्रोत्राचा उल्लेख आढळूण येतो. सुख- समृद्धिच्या प्राप्तीसाठी कमाला स्त्रोत्राचे पठन लाभकारी ठरतो. या कमला स्त्रोत्रामध्ये सुध्दा आपणास देवीचा उल्लेख खालील प्रमाणे आढळतो.

कालिका त्वं कालिघाटे कामाख्या नीलपर्वत ।

विरजा ओड्रदेशे त्वं प्रसन्ना भव सुंदरि ॥

अर्थ- हे देवी, तु लालीघाटावर काली कालिका , नीलपर्वत पर कामाख्या आणि औड्र देशात विरजारूपात विराजमान आहेस. हे सुंदरी ! तु सदा आमच्यावर प्रसन्न रहा. तसेच कालिका पुराणानुसार प्रथम पीठ 'औंड्र पीठ' आहे.

"औंड्राख्यं प्रथमं पीठं द्वितीयं जालशैलकम्।

औंड्रपीठं पश्चिमे तु तथैवोंड्रेश्वरी शिवाम्।

कात्यायनीं जगन्ना मो ड्रेशं च प्रपूजयेता॥"

          हे औण्ड्रपीठच ओडिसा असून येथे वडार समाजाचे पुर्वज आपल्या सुवर्ण कालखंडात आपल्या राज्यावर शासन करत होते. याजपुर येथे विरजा देवी या देवीचे स्थान असून उत्कल म्हणजेच उडीशाची ती प्रधान देवी आहे जिचे वर्णन ब्रह्मपुराण मध्ये खालील प्रमाणे आढळूण येते.

विरजे विरजा माता ब्रह्माणी संप्रतिष्ठिता।

यस्याः संदर्शनात्मर्त्यः घुनात्या सप्तमं कुलम्॥

असा आदिशक्ती व वडार समाजाच्या पुर्वजांचा प्राचिन संबंध असून वडार समाजातील सर्वांनी याची दखल घेवून या इतिहासाचा प्रसार वडार समाजात व इतर समाज बांधवांपर्यंत केला पाहिजे हे मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते.

वडार समाज पान ६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ........... सेटलमेंटस (Sattelments) सेटलमेंटस (Sattelme...